महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी जे एम एफ सी तृतीय न्यायालयाने शहापूर पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
१ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या सायकल फेरीत भाग घेतलेल्या एकूण ४३ कार्यकर्त्याना अटक करून त्यातील आरोपी क्र. १ ते ६ यांचेवर रोजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. व आरोपी क्र. ६ ते १८ या १३ कार्यकर्त्यांना शहापूर पोलिसांनी शहापूर पोलीस स्थानकात अमानुष मारहाण केली होती. या अमानुष मारहाणी विरोधात वकील महेश बिर्जे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यावर सोमवारी सुनावणी होऊन शहापूर पोलिसांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.