मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत बेळगावचा आवाज घुमला आहे.
बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या. महाराष्ट्रातील संपूर्ण सकल मराठा समाज सीमा वासीयांच्या पाठीशी असून सीमा प्रश्ननाची सोडवणूक झाली पाहिजे बेळगाव महाराष्ट्रात आला पाहिजे असा ठराव मांडण्यात आला.
बेळगाव सकल मराठा समाजाच्या वतीने गुणवन्त पाटील, नेताजी जाधव, विलास बेळगावकर, एस एम बेळवटकर, सुनील जाधव समील झाले होते.
केंद्र शासित करा
बेळगाव सह सीमा भाग सुप्रीम कोर्टातील निकाल लागेपर्यत केंद्र शासित करा अशी मागणी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी मांडली. गोलमेज परिषदेत सीमा वासीयांच्या वतीनं नेताजी जाधव यांनी बेळगाव प्रश्नी सर्वांचं लक्ष वेधलं.सकल मराठा समाजाने बेळगाव प्रश्नी केंद्र शासित करण्यासाठी दबाव वाढवावा अशी मागणी जाधव यांनी केली