कर्नाटक लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणं सोपी गोष्ट नसते कुटुंबातील एक सदस्य उत्तीर्ण होईपर्यंत बरेच परिश्रम मेहनत घ्यावी लागते इथं दांपत्यानं सोबतीनं के ए एस परीक्षा उत्तीर्ण केली आहे. बेळगाव तालुक्यातील बडस गावचे ग्राम पंचायत विकास अधिकारी अशोक मिरजी आणि त्यांची पत्नी मच्छे ग्राम पंचायत विकास अधिकारी भवानी मिरजी(नायक) या दोघांनी के ए एस परीक्षा पास होऊन समाजा समोर नवीन आदर्श ठेवला आहे.
मुळचे अथणी तालुक्यातील ऐगळी गावचे अशोक मिरजी यांनी पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून भर्ती होऊन एम ए पदवी घेतली होती 2002 ते 2011 पर्यंत बेळगाव पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणुन कार्य केले होते त्यानंतर 2011 ते 2013 मध्ये केंद्रीय गुप्तचर विभागात ज्युनियर अधिकारी म्हणून काम केलं आहे. 2013 मध्ये पी डी ओ परीक्षा देऊन ते बडस चे पंचायत विकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपली पत्नी भवानी मिर्जी सोबत के ए एस परीक्षा दिली होती यात दोघे नवरा बायको उत्तीर्ण होऊन कर्नाटक राज्य रेव्हेन्यू विभागात कार्यरत आहेत. भवानी मिर्जी मूळच्या शिमोगा जिल्ह्यातील सागर तालुक्यातील ताळूगोप गावच्या आहेत . या 2010 मध्ये पी डी ओ परीक्षा उत्तीर्ण होऊन मच्छे येथे विकास अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. अश्या या दंपतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.