बेळगाव live मुळे बेळगावात येऊन गेल्याची प्रचिती येते पश्चिम बंगाल मध्ये राहून शासकीय सेवेत व्यस्त असताना बेळगाव च्या घटना वेळेवेळी बेळगाव live माध्यमातून कळतात असे कौतुकाचे शब्द प्रोबेशनरी आय ए एस अधिकारी अभिजित शेवाळे यांनी व्यक्त केले
पत्रकार विकास अकादमी च्या संघाच्या कार्यालयात शेवाळे यांचा अकादमीच्या वतीनं पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आलं त्यावेळी पत्रकारां समवेत केलेल्या हितगुजाच्या वेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
प्रशासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना काटेकोर पणाने राबवून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यास प्राधान्य देऊ अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली .
शेतकरी कुटुंबात जन्मून मराठी माध्यमात शिक्षण घेतलं असलं तरी व्यवस्थित नियोजन बद्ध रित्या अभ्यास केल्यास आय ए एस (यु पी एस सी)परीक्षा उत्तीर्ण होण कठीण नाही. यु पी एस सी अभ्यासक्रम खडतर असल्याचा जो गवगवा होतोय तो व्यर्थ आहे असंही ते म्हणाले.यावेळी पत्रकार विकास अकादमी चे प्रशांत बर्डे, पत्रकार प्रसाद प्रभू, रवी नाईक,प्रकाश बेळगोजी, द्वारकानाथ ओरणकर, सी आर चिकमठ, महेश काशीद ,चेतन कुलकर्णी, विजय मोहिते,आदी उपास्थित होते.
असा झाला यु पी एस सी चा प्रवास
28 वर्षीय अभिजित शेवाळे यांनी सरकारी प्राथमिक मराठी शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कारदग्यात करत यु पी एस सी परीक्षेत यश मिळवलं आहे. कोल्हापूर येथिल स्वामी विवेकानंद कॉलेज मध्ये डिग्री करत बी डी एस पूर्ण केलं . 2014 मध्ये यु पी एस सी च्या पहिल्या प्रयत्नात 354 वा रँक मिळवत आय आर एस च सहा महिने प्रशिक्षण देखील करत करत 2015 ला यु पी एस सी दुसऱ्या प्रयत्नात 90 वा रँक घेत आय ए एस उत्तीर्ण झाला .आज पश्चिम बंगाल खड्गपुर जिल्ह्यातील मिदनापूर येथे सहाययक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहे .बंगाल ला सेवेत दाखल झाल्यावर सहा महिन्यात त्याने बंगाली भाषा अवगत केली असून त्यांना इंग्लिश हिंदी सोबत रशियन बंगाली भाषांचे ज्ञान आहे.