रक्तदाब असेल तर काही पथ्ये आवर्जून पाळावी लागतात. गोळ्या घेण्याच्या वेळा पाळल्यास योग्य आहार, व्यायामाची जोड व औषधोपचाराने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. त्यामुळे पुढे होणारे आरोग्याचे गुंतागुंतीचे प्रश्न सुटतात.
रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर रक्तप्रवाहामुळे पडणाऱ्या दाबाला रक्तदाब असे म्हणतात. रक्तदाब मिलिमीटर ऑफ मर्क्युरी या परिमाणात मोजला जातो. रक्तदाब १२०/८० मिमी ऑफ मर्क्युरी असा लिहितात. हृदय, मेंदू, मूत्रपिंड या महत्त्वाच्या अवयवांचे कार्य निर्धोक व्हावे आणि ते निरोगी रहावेत याकरिता तसेच सर्वसाधारण आरोग्याकरिता रक्तदाब सामान्य पातळीवर असणे आवश्यक आहे. रक्तदाब हृदय आकुंचनाच्या वेळी १४० आणि हृदय प्रसरणाच्या वेळी ९० एवढा अथवा त्यापेक्षा जास्त असणे म्हणजे उच्च रक्तदाब होय.
लठ्ठ व्यक्तींमध्ये उच्चरक्तदाब होण्याची शक्यता दुप्पट ते सहापट असते. ज्या प्रमाणात वजन वाढते, त्याप्रमाणात रक्तदाब वाढत जातो. प्रत्येक व्यक्तीचे वजन त्या व्यक्तीच्या उंचीच्या प्रमाणात (बॉडी मास इंडेक्स) असणे आवश्यक असते.
आपण आहारात चवीसाठी मीठ वापरतो. मिठातील सोडियम व क्लोराईड या क्षारांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो. रक्तदाब वाढीसाठी तसेच हृदयविकार, पक्षाघात यासारख्या गंभीर आजारांना मिठाचे अतिसेवन कारणीभूत ठरते.
वजन नियंत्रित राहण्यासाठी आणि हृदयाचा व्यायाम म्हणून नियमित शारीरिक व्यायाम गरजेचा ठरतो. तसेच, त्याने मनावरचा ताणही कमी होतो. किमान ४० मिनिटे रोज चालणे, हा एक उत्तम व्यायाम ठरू शकतो.
उच्चरक्तदाबामुळे हृदयावरील कामाचा भार वाढतो. हृदयाला वाढीव काम करावे लागते. रक्तवाहिन्यांच्या भिंती या सततच्या उच्चरक्तदाबाने जाडसर होऊ लागतात. या बदलाला अॅथरोस्केरॉसिस असे म्हणतात. अर्थातच, यामुळे शरीरातील विविध महत्त्वाच्या अवयवांना पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहावर विपरीत परिणाम होतो. कालांतराने या महत्त्वाच्या अवयवांचे काम बिघडते व पेशंटला विविध व्याधी जडतात.
डोकेदुखी, धाप, छातीत दुखणे, चक्कर, छातीत धडधडणे, नाकातून रक्तस्राव. अनेक पेशंटमध्ये उच्च रक्तदाबाचे कोणतेही लक्षण आढळत नाही. त्यामुळेच रक्तदाबाची नियमित तपासणी करणे गरजेचे ठरते.
उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम :हृदयविकाराचा झटकाहृदयाचा आकार वाढून ते अकार्यक्षम बनते.रक्तवाहिन्यांना फुगवटे येणे, त्या कमकुवत बनणे. त्यामुळे रक्तवाहिन्या फुटणे, तुंबणे.मेंदूत रक्तस्राव झाल्याने पक्षाघातमूत्रपिंड निकामी होणेअंधत्व
रक्तदाब नियंत्रणासाठी
आरोग्यदायी आहार : ताजी फळे, तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थाचे कमी सेवन, मिठाचे सेवन दिवसाला फक्त पाच ग्रॅमप्रोसेस्ड अन्न, लोणचे, पापड, चटणी, सॉस खाणे टाळा.वजन संतुलित राखा. रोज किमान अर्धा तास चाला.तंबाखू, धूम्रपान टाळा. (धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांना इजा होते, त्या अधिक टणक होतात.)मद्यपान मर्यादित ठेवा.रक्तदाब नियमित तपासा.उच्च रक्तदाबाचे निदान झाले असेल तर नियमित उपचार घ्या.मधुमेहासारख्या आजारावर नियमित उपचार घ्या.हिरव्या भाज्यांमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हिरव्या भाज्या कायम आहारात असाव्यात. ऋतुप्रमाणे फळे खावीत. गाजर, बीट, काकडी, टोमॅटो, कांदा, कोबी या भाज्या कच्च्या खाव्यात.लसूण खाल्ल्यास कोलेस्टरॉल आणि रक्तदाबाचे प्रमाण कमी होते.तेल, तूप यांचे जेवणातील प्रमाण दिवसाला १५ ग्रॅमपेक्षा अधिक असू नये.तूरडाळ, चवळी, ओट्स, फळे यामुळे कोलेस्टरॉल कमी व्हायला मदत होते.तंतुमय पदार्थामुळे कार्बोहायड्रेट आणि फॅट्सचे शरीरातील प्रमाण नियंत्रणात राहते. याचे प्रमाण दिवसाला ३०-४० ग्रॅम असावे. अतिगोड पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स, अल्कोहोल सेवन टाळावे.भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.रोजच्या जेवणात विविध प्रकार असावेत. मिश्रान्न हे कधीही उत्तम. कडधान्यामुळे शरीराला पुरेशी प्रथिने मिळतात.
डाॅ.सोनाली सरनोबत
लेखिका होमिओपॅथिक तज्ञ आहेत.
सरनोबतस् मल्टीस्पेशालीटी होमिओपॅथी
अमर एंपायर
गोवावेस बेळगाव
09916106896
09964946918