जेंव्हा सारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कमी पडतात तेंव्हा स्वतः आघाडी घेऊन पुढे सरसावणारा खरा नायक ठरतो. नावातच नायक असलेल्या विनायक गुंजटकरांनी हे आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर सिद्ध केले आहे. शिवजयंतीलाच शिवसृष्टी खुली व्हावी या शिवभक्तांच्या मागणीला सत्यात उतरण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. तहान आणि भूक हरपून मनपा यंत्रणेला कामाला लावत त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. महापौर उपमहापौर गट नेते आणि आमदारना मागे टाकत शिव सृष्टीचं काम पूर्णत्वाकड नेण्यासाठी ते झटत आहेत
गुंजटकर यांनी मनपाचे बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्यातील नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. लोकांनी आपल्याला ज्या कामासाठी निवडून दिले आहे ते काम प्रामाणिकपणे करण्यावर भर देणे हेच लोकप्रतिनिधींचे खरे काम, त्यात इतरांची साथ न मिळाल्याने गुंजटकर काहीवेळा अपयशी झाले मात्र त्यांच्या प्रयत्नांची दखल घ्यावीच लागते. ते एक नवीन नेतृत्व आहेत, अशा माणसाकडे सत्ताधारी गटनेतेपद आल्यास मराठी गटाची शान आणि मान अबाधित राहू शकणार आहे.
मीटिंग घेतो, बघतो, सूचना देतो असे म्हणत वेळकाढूपणा करणाऱ्या नेत्यांना गुंजटकारांनी चांगलीच चपराक दिली आहे, पैसे नसतील तर स्वतः देतो मात्र काम करा अशी तंबी कंत्राटदाराला दिली आहे, कोणत्याही परिस्थितीत शिवजयंतीला शिवसृष्टीचे उदघाटन करणार असा पण त्यांनी केला आहे, यातून त्यांचा लोकाभिमुख कारभार लक्ष्यात येतो.
मध्यंतरी एक आमदाराच्या शिक्षण संस्थेच्या बेकायदेशीर शेडसाठी आंदोलन पुकारून गुंजटकर चर्चेत आले, खुल्या सभागृहात त्यांना विरोध झाला मात्र एकला चलो रे म्हणत त्यांची वाटचाल सुरु आहे.अनेक ठिकाणी असलेली अतिक्रमण विरोधात त्यांनी मोहीम उघडली आहे