मराठा सेंटर मध्ये गोल्फ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत खेळांना चालना देण्यासाठी मराठा रेजिमेंटल केंद्रात दरवर्षी ही स्पर्धा होत असते .निवृत्त कर्नल अजित चव्हाण यांनी २०१७ चा मराठा गोल्फ चषक जिंकला . मराठा कप ही बेळगावातील प्रतिष्टीत स्पर्धा असून बेळगावसह आजूबाजूच्या शहरातील खेळाडू संघ या स्पर्धेत उत्साहाने सहभागी होत असतात १८ व्होल कोर्स च्या हिरव्या आणि ताज्या गोल्फ कोर्स मध्ये विविध वयोगटातील ११३ गोल्फर्स खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग दर्शविला होता . यावेळी विजेत्या खेळाडूंना बक्षीस देण्यात आली. लष्कर अधिकारी आणि नागरी महनीय व्यक्ती बक्षीस वितरण समारंभात सहभागी झाले होते . बक्षीस समारंभात यावेळी ब्रेगेडीअर प्रवीण शिंदे , तरुण भारत संपादक किरण ठाकूर , निवृत्त पोलीस उपाधीक्षक पी बी हार्दी आदी उपस्थित होते
Trending Now