समर्थ नगर येथे रस्त्यावरून ड्रेनेज लाईन घालण्याचा प्रकार सुरू आहे. नागरिकांनी याला विरोध केला आहे. अशाप्रकारे घातलेल्या लाईन मध्ये घरा घरातील सांड पाणी सोडणे अवघड आहे.
हा प्रकार निधी वाया घालण्याचा असून रस्तेही उगाच अडविले जात आहेत, याबद्दल अभियंत्यांची प्रतिक्रिया विचित्र आहे, रस्ता करणे हे वेगळे काम आहे, ते नंतर केले जाईल असे तो सांगत आहे.
असाच प्रकार ओम नगर येथे सुरू आहे. घरोघरी सेप्टिक टॅंक आहेत, रस्ते व गटारी बांधण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Trending Now