बेळगाव महा पालिकेच्या आवारात तब्बल एक कोटी २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणारे महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमास महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले सह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृह मंत्री जी परमेश्वर आणि राज्यपाल यांना कार्यक्रमाला आमंत्रण देऊन न भूतो न भविष्यती असा अनावरण कार्यक्रम झाला पाहिजे अशी मागणी दलित संघटनेचे नेते अशोक अय्यान्नावर यांच्यासह विविध दलित नेत्यांनी केली आहे .
शनिवारी दुपारी पालिका सभागृहात महापौरांनी आंबेडकर स्मारक अनावरण कार्यक्रमाच्या आयोजनाच्या तयारी साठी बैठकीचे आयोजन केल होत. यावेळी पालिका आयुक्त शशिधर कुरेर, महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, किरण सायनाक ,पंढरी परब स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित होते. १४ एप्रिल आंबेडकर जयंती नंतर किंवा अगोदर चर्चा करून हा कार्यक्रम ठरविला जाईल यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची वेळ मागू आणि त्या नंतर तारीख निश्चित करू अशी माहिती आयुक्तांनी दिली . १२६ वी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी व्हावी १४ एप्रिल नंतर एखाधा दिवस ठरवून कार्यक्रम करूया संभाजी चौकात संभाजी महाराजा समोर आंबेडकर यांचा पुतळा ठेऊन भव्य मिरवणुकीसह पालिका आवारात स्वागत करून उद्घाटन करा असा सल्ला दलित नेते मल्लेश चौगुले यांनी दिला . यावेळी दलित नेते मल्लेश कुरंगी दुर्गेश मेत्री ,संतोष कांबळे गजानन धरनाईक आदी उपस्थित होते .
असा असेल बाबासाहेब स्मारक
महा पालिकेच्या वतीने तब्बल एक कोटी २५ लाख खर्चून हे स्मारक उभारण्यात येत असून दक्षिण भारतात सर्वात उंच असा १७ फुटी बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकावर बसविला जाणार आहे . बापट गल्लीतील ख्यात मूर्तिकार संजय किल्लेकर हा पुतळा साकारत असून तो अंतिम टप्प्यात आहे. १९३९ साली स्वत बाबासाहेबांनी जुन्या महा पालिकेच्या कार्यालयाला भेट दिली होती त्यामुळे बेळगाव महा पालिका आणि बाबासाहेब आंबेडकर याचं वेगळ नात आहे .