बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील झुंझुरवाड गावात सहा वर्षीय मुलगी बोरवेल मध्ये पडली असून तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
कावेरी अजित मादर वय सहा वर्षे अस दुर्दैवी मुलीचं नाव आहे.
शंकर हिप्परगी नावाच्या शेतात असलेल्या बोरवेल मध्ये सदर मुलगी पडली असून तिला वाचवण्यासाठी अग्नीशामक दलाचे जवान घटना स्थळी तळ ठोकून आहेत. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. अंदाजे 400 फूट खोल बोरवेल मध्ये ही मुलगी अडकली आहे
शेतात अंधार असल्याने बचाव कार्यात अडथळे येत असून ऐगली पोलीस देखील घटना स्थळी तळ ठोकून आहेत. जिल्हाधिकारी एन जयराम आणि पोलीस अधीक्षक रविकांत गौडा हे घटनास्थळी भेट देऊन लक्ष ठेऊन आहेत. विजापूर अथणी आणि बेळगाव हुन देखील अग्निशामक पथकास बोलावून घेण्यात आले आहेत अशी माहिती मिळाली आहे.एन डी आर एफ आणि कोलार हट्टी गोल्ड खाण आणि हैद्राबाद हुन विशेष टीम उध्या सकाळी दाखल होणार आहे अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ यांनी दिली असून कोणत्याही स्थितीत कावेरी वाचवण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे.