अगसगा येथील शेतकऱ्याचा चावा घेत जखमी करून लोकांना त्रास देणार पिसाळलेल्या माकडास वन
खात्याने जेरबंद केलं आहे.काकती वन अधिकारी नागराज बाळेहोसुर यांच्या नेतृत्वातील अधिकाऱ्यानी जेरबंद करण्यात यश मिळवलंय. शेताला ट्रॅक्टर चालवत जात असतेवेळी शिवानंद कल्लाप्पा पाटील या शेतकऱ्याचा चावा घेत जखमी केलं होतं त्यानंतर हा विषय वन खात्यानं गांभीर्यानं घेत खास पथक पाठवून माकडास जेरबंद केलंय. लोकांना त्रास देणाऱ्या माकडाचा बंदोबस्त केला आहे अशी माहिती आर एफ ओ बालेहोसुर यांनी दिलीय