खेळता खेळता बोरवेल मध्ये पडलेल्या कावेरी मदार या बालिकेला वाचवण्यासाठी एन डी आर एफ ची टीम प्रयत्न करत असून पुणे हुन 20 जणांचं पथक झुंझुरवाड दाखल झाल असून बचाव कार्य सुरू झालं आहे.
जिल्हाधिकारी एन जयराम, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाल पोलीस अधीक्षक रविकांत गौडा यांच्या सह अनेक अधिकारी झुंझुरवाड येथे शनिवारी रात्री पासून तळ ठोकून आहेत काल रात्री पासूनच कावेरी ला वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
एन डी आर एफ च्या नेतृत्वात सुरू असलेल्या बचाव मोहिमेवर जिल्हाधिकारी एन जयराम सतत लक्ष ठेऊन आहेत जे सी बी चा देखील वापर करून बोरवेल मध्ये अडकलेल्या चिमुकली चा जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू झाले आहेत.
400 फूट खोलीच्या बोरवेल मधील कावेरी पाहण्यासाठी स्थानिक लोकांची गर्दी झाली आहे माती काढण्याचं काम सुरू आहे एकीकडे कावेरी च्या नातेवाई कांचा आक्रोश तर दुसरीकडे लोकांची गर्दी असेच चित्र या ठिकाणी आहे दुपारी 12 पर्यंत बचाव कार्य पूर्ण होऊ शकत अशी माहिती मिळत आहे.
Good bless you kaveri