Saturday, December 21, 2024

/

बेळगावकराने घडविले आदर्श युथ हॉस्टेल

 belgaum

पणजी युथ हॉस्टेल ठरलं देशात अव्वल
पणजी युथ हॉस्टेल चे मुख्य अधिकारी अनंत जोशी हे मुळ बेळगावचे आहेत ते निवृत्त नेव्ही अधिकारी असून सध्या गोवा राज्य युवजन क्रीडा मंत्रालयाच्या युथ हॉस्टेल चे मुख्य अधिकारी म्हणून सेवा बजावतात . नुकताच दिल्लीत झालेल्या युवजन आणि क्रीडा खात्याच्या बैठकीत पणजी युथ हॉस्टेल देशातील इतर युथ हॉस्टेल ना आदर्श घ्यावं अस आहे असा उल्लेख केला आहे युवजन क्रीडा खात्याचे अप्पर सचिव अमरेंद्र कुमार दुबे यांनी पणजी युथ हॉस्टेल मधील नाविन्यपूर्ण प्रयोग देशातील इतर युथ हॉस्टेल ना स्वावलंबी बनवतील असा उल्लेख केला आहे. पणजी युथ हॉस्टेल तोट्यातून नफ्याकडे आणण्यात अधिकारी अनंत जोशी यांनाच सगळं श्रेय जातं, सहा वर्षांपूर्वी त्यांनी हॉस्टेल चा ताबा घेतला होता वार्षिक उत्पन्न 3 लाखाहून आज 85 लाखा पर्यंत नेऊन ठेवलं आहे. केंद्रीय युवजन क्रीडा खात्याने हे हॉस्टेल देशातील आदर्श युथ हॉस्टेल असा ठराव देखील दिल्लीत मांडण्यात आला

अनंत जोशी
संचालक युथ हॉस्टेल पणजी
मोबाईल-09422971250ANant joshi goa

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.