बेळगाव दि 8 – घरामध्ये पालक आणि मुलांमधील संवाद थांबल्यामुळे आज बलात्कार सारख्या अप्रिय घटना सारखे प्रकार होत आहेत. यासाठी दिवसातून एकदातरी सर्व कुटुंबाने एकत्र येणे गरजेचे आहे असं मत महापौर संज्योत बांदेकर यांनी व्यक्त केले .
जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन च्या वतीनं आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या नंतर बोलत होते .
अध्यक्षस्थानी उमेश पाटील होते, व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संभाजी पाटील, माजी महापौर सरिता पाटील, नगरसेविका माया कडोलकर, उज्वला संभाजी पाटील, मोहन कारेकर, होते.
प्रास्ताविक व स्वागत मदन बामणे यांनी केले.
माजी महापौर सरिता पाटील म्हणाल्या की स्त्रियावर होणारे अत्याचार थांबण्यासाठी जायंट्स सारख्या संस्थानी पुढे आले पाहिजे. समाजात जाऊन प्रभोधन केले पाहिजे,
आमदार संभाजी पाटील यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी समाजातील उत्कृष्ट कार्य केलेल्या चार महिलांचा सत्कार केला.
निर्झरा चिठ्ठी :- कर्नाटकातील एकमेव महिला सर्पमित्र , आजपर्यंत 600 च्या वर साप पकडून त्यांना न मारता दूर जंगलात जाऊन सोडून देऊन समाजामध्ये सापविषयी असलेल्या भीतीला दूर करण्याचे कार्य त्या करताहेत.
ऋतुजा पवार:- हीने आतापर्यंत राष्ट्रीय जलतरणाच्या 15 स्पर्धामध्ये भाग घेतला, त्यामध्ये 3 सुवर्ण, 3 रौप्य, आणि चार कांस्य पदकांची कमाई तिने केली आहे, डायव्हिंग प्रकारात तिने ऑस्ट्रेलियातील एडलेड शहरात भारतीय संघातून जाऊन आपली कला सादर केली आहे.
कस्तुरी बंगेर :- हि गेली 18 वर्षे रेल नगर येथील नंदन मक्कळ धाम या संस्थेत गेली 18 वर्षे एचआई व्ही बाधित 40 मुलांची आई म्हणून सेवा करत आहे , त्याबद्धल त्यांचा सत्कार आम्ही करीत आहोत.
राधिका जी. :- या आयपीएस अधिकारी म्हणून रुजू झाल्या, आणि सद्या त्या बेळगाव येथील कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या प्रमुख आहेत.
अशा चार महिलांचा सत्कार आज बुधवार ता. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही करीत आहोत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पाटील यांनी केले तर आभार अशोक हलगेकर यांनी मानले.यावेळी जायंट्स मेन, जायंट्स सखी, हॉकी बेलगाम चे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.