विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव live ने निवडणूक पूर्व सर्वेक्षण सुरु केले आहे. या सर्वेक्षणात सर्वप्रथम आढावा घेण्यात आला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकंदर डावपेचांचा, हे विश्लेषण बेळगावचे दै वार्ता ला पटले आहे. ही घ्या त्याची पोचपावती, धन्यवाद वार्ता.
वार्ताने बेळगाव live च्या सौजन्याने असा उल्लेख करून आमचे विश्लेषण जसेच्या तसे छापले आहे. Web page journalism या नव्या क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची ही दखलच आहे असे आम्ही मानतो.
स्वतंत्र प्रगती, रण झुंजार, पुढारी या सारख्या दैनिकांनीही यापूर्वी बेळगाव live च्या लेखनाला प्राधान्य दिले आहे. आम्ही माध्यम क्षेत्रात सहाय्यक आहोत, ज्यांना जे पटेल ते आपल्या माध्यमातून लिहू शकतात. समाज प्रबोधनाच्या या क्षेत्रात असेच एकमेका साहाय्य करूया.