बेळगाव दि २ : कौटुंबिक वादातून एका गृहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना वीरभद्र नगर येथे घडली आहे. फैरोजा तटगार वय २५ अस मृतक महिलेच नाव आहे .
या घटने बाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार बुधवारी रात्री गळफास लाऊन आत्महत्त्या केली आहे मात्र खून करून गळफास लावल्याचा भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप फैरोजा च्या सासरच्या मंडळीनी केला आहे . गेली दोन वर्ष पती पत्नी किरकोळ वादातून वाद होत असायचे . या प्रकरणी फैरोजा चा पती अजीम इस्माइल तटगार यास मार्केट पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे . या प्रकरणी मार्केट पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.