Sunday, December 1, 2024

/

जिल्ह्यातील मराठी शाळा वाचवा हो…

 belgaum

Marathi school
अनेक मराठी शाळांचे वर्ग कमी झाले. शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली. ते वर्ग वाढविण्याची गरज असताना कुठलेही नियोजन न करता राज्य शासनाने शाळा देण्याचे निकष बाजूला सारत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा वाटल्या. यामुळे जिल्ह्यातील मराठी शाळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे,त्याच बरोबर मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी शाळेत पाटवून न देता इंग्लिश माध्यम पाठवून देत आहेत असे स्पष्ट काही मराठी जपणूक युवकांनी व्यक्त केली आहे. दैवीक हळदणकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी धर्मवीर संभाजी चौकात जनजागृती करण्यात आली. प्रति रविवारी प्रत्येक चौकत हि जनजागृती करण्यात येणार आहे असे त्यानी सांगितले… मराठी शाळा वाचवा आपली मुले मराठी शाळेत पाठवा असे फलक घेतल्या मुळे साऱ्याचे लक्ष वेधले जात होते..

सीमाभागात अनेक शाळांत पटसंख्या कमी होत आहे. अनेक शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यांचे समायोजन अद्यापही झालेले नाही. असे असताना नवीन इंग्लिश शाळा चालु करून देऊन अनेक शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतील. याची सर्वस्वी जबाबदारी उपसंचालक व शिक्षणाधिकारी स्वीकारतील का, असा सवाल करण्यात आला. विद्यार्थ्यांची पटसंख्या लक्षात घेऊन एका मराठी शाळेपासून दूर अंतरावर आवश्यकता असल्यास नवीन शाळा दिली जाते. मात्र, जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेजारी शेजारी इंग्लिश शाळा दिल्या आहेत. यामुळे पालकाच्या गैर समज मुळे मराठी एवजी इंग्रजी शाळेत मुले पाटवून देत आहेत त्या मुळे मराठी शाळेचे भवितव्य धोक्यात आले अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा मराठी शाळेत आपली मुले पटवून द्या असे हि आवाहन करण्यात आली.. विजय निंबाळकर,सुरज जाधव,रोहन लंगरखांडे ,विशाल गौंडाडकर , यांच्यासह अनेकांचा समावेश होता.
जिल्ह्यातील मराठी शाळा वाचवा धर्मवीर संभाजी चौकात जनजागृती करण्यात आली. प्रति रविवारी प्रत्येक चौकत हि जनजागृती करण्यात येणार आहे

 belgaum

1 COMMENT

  1. हे नेक काम हाती घेतल्याबद्दल मनापासून आभार. ह्या आणि अशा कामाची खरच गरज आहे. इंग्रजी, हिन्दी भाषा म्हणून नीट शिका, पण मराठी च्या अस्तित्वाला धोका न पोहोचवता. एका इयत्तेनंतर इंग्रजी मध्ये काही विषय ( उदा. शस्त्र, गणित ) प्राप्त आहे असे जरि धरून चाललो तरी बाकी विषय आणि शाळेचे कामकाज मराठी मधेच व्हायला हवे. पण सध्याचे चित्रा फार वेगळे आणि उदासवाणे आहे. आणि हा काही फक्त बेलगावतला प्रश्न नाही. अख्ख्या महाराष्ट्रमध्ये ही गत आहे. ह्यासाठी सर्वसामान्य मराठी माणसांनी सगळे भेदभाव सोडून देऊन एकत्र येऊन हे काम करायला हवं. सरकारवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. एकंदर मराठी भाषा सोडून बाकी सगळया गोष्टींसाठी सध्या महाराष्ट्रात काम सुरू आहे असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.