Monday, March 10, 2025

/

संभाजी द रिअल किंग

 belgaum

महापौरपदी संज्योत बांदेकर आणि उपमहापौर पदी नागेश मंडोळकर यांची निवड झाली. मराठी नगरसेवकांची मोट बांधून सत्ता कायम राखण्यात आमदार संभाजी पाटील द रिअल किंग ठरले आहेत, ही निवडणूक पुढील आमदारकी निवडणुकीतल्या नव्या समिकरणांची नांदी आहे, असेही बोलले जातेय.

मराठी महापौरच करणार आणि उपमहापौरपदही  दुसरीकडे जाऊ देणार नाही असा शब्द देऊन आमदारांनी तो खरा करून दाखवला, महापालिकेच्या एकंदर कार्यवाहीत ते किंग मेकर म्हणूनच ओळखले जातात. हातात मोजके नगरसेवक असतानाही त्यांनी यापूर्वी विजयश्री खेचून आणली होती हा इतिहास आहे आणि यावेळी तर हाती होते तब्बल ३२ नगरसेवक, त्यापैकी काही इतर मार्गाला लागले होते, मात्र संभाजीरावांच्या अनुभवी खेळीने मराठी आणि मराठ्यांचा पुन्हा एकदा विजय झाला आहे.

बेळगाव उत्तर मतदार संघातील आमदारकीची गणितही आत्तापासून ठरू लागली आहेत. यातच महापौर आणि उपमहापौर पदावरील दोन्ही उमेदवार उत्तरचेच आहेत. याचा फायदा घेऊन संभाजीराव दक्षिणेत दुसऱ्याला संधी देऊन उत्तरेत स्वतः उभे राहतील अशी शक्यताही व्यक्त होत आहे, सोशल मीडिया वर तसे चित्र आहे. महापौर उपमहापौर दोन्ही उत्तर विधान सभा मतदार संघातील असल्याने संभाजी पाटील यांना समितीची उत्तर उम्मेद्वारी का देऊ नये अशी चर्चा देखील होत आहे त्यातच इतर अल्पसंख्याक मत आणण्यात पाटील अग्रेसर होतील असा सोशल मिडीयावर ट्रेंड आहे.

सध्या किंग आणि किंगमेकर संभाजी पाटील ठरले आहेत, यातून पुढील काळात आणखी विजयश्री आणण्याचे त्यांचे डावपेच असतील तर नक्कीच स्वागत आहे, यामुळे विरोधकांची बुडे मात्र हादरणार आहेत. म्हणूनच बेळगाव लाईव्ह आमदार संभाजी पाटील यांना किंग मेकर नव्हे तर संभाजी रियल किंग असा उल्लेख करत आहे.sambhaji the real king

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.