बेळगाव दि 14 – लखन जार्किहोळी हे आगामी विधान सभा निवडणुक यमकनमर्डी मतदार संघातून लढावं असा पक्ष श्रेष्ठींचा विचार आहे त्यांच्या सुचने नंतर चांगला उद्देश्य ठेऊन हा विचार मांडला होता जर का सतिश यांचं मन दुखलं असेल तर स्वता त्यांना भेटून त्यांची मनधरनी करिन असं वक्तव्य लघु उद्योग मंत्री रमेश जार्किहोळी यांनी व्यक्त केलंय .
सतीश जार्किहोळी यांनी बेडर रामोशी समाजासाठी चांगलं काम केलं आहे .रायचूर ग्रामीण मतदार संघात बेडर समाजाची संख्या अधिक असून रायचूर मध्ये आमच्या समाजात चांगलं नेतृत्व नाही म्हणून सतीश यांनी रायचूर तर लखन यमकनमर्डी विधान सभा मतदार संघातून लढावं असं मी सूचविल होतो असंही रमेश जार्किहोळी यांनी म्हटलं आहे .
मागील विधान सभा निवडणुकीत आम्ही लखन साठी यमकनमर्डी तुन तिकीट मागितलं होत त्यावेळी पक्ष श्रेष्ठीनी पुढील वेळी तिकीट देण्याचं आश्वासन दिल होत . यासगळ्या चा विचार करून सतिश यांनी रायचूर ला निवडणूक लढवावी अजून विचार करावा मी लखन जार्किहोळी साठी यमकनमर्डी साठी प्रयत्न करणार आहे असं पालकमंत्री म्हणाले.
विधान सभा निवडणूक अजून एक वर्ष पुढं असली तरी सतीश विरुद्ध रमेश असा संघर्ष सुरूच आहे .दोन्ही जार्किहोळी बंधूंच्या वादाच सत्ताधारी काँग्रेस पक्षाला नुकसान होणार हे निश्चित !!!
Must