Saturday, December 21, 2024

/

पांगुळ गल्लीत म्हशी पळवण्याची जंगी शर्यत

 belgaum

pangul galli sharyatबेळगाव दि २३- जीवनातील एक घटक असलेला गवळी समाज दरवर्षी दीपावलीच्या पडव्यापासून ज्याच्यावर वर्षभर जीवापाड प्रेम करतो ती त्यांची जीवनदाहिनी म्हणजे “म्हैस” पळवण्याच्या शर्यती चे आयोजन करत असतो.
यावर्षी पण या समाजाने विविध भागात याचे आयोजन केले होते, त्याच पद्धतीने पांगुळ गल्लीत मंगळवारी ता.२१ रोजी संध्याकाळी ही स्पर्धा पार पडली.पांगुळ गल्लीतील अश्वथामा युवक मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
गल्लीतील जेष्ठ पंच मनोहर भातकांडे हे कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर नगरसेविका माजी उपमहापौर मीना वाझ,माजी नगरसेवक रायमन वाझ,मल्हारी कुऱ्हाडे, अरुण मुतकेकर, महादेव पाटील होते.मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण हांगिरगेकर यांनी मान्यवरांना मानाचा भगवा फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
स्पर्धेचे उदघाटन या प्रभागाच्या नगरसेविका माजी उपमहापौर मीना वाझ यांच्या हस्ते फित कापून केले.स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला,जवळपास ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता, ही स्पर्धा दोन गटात झाली, लहान गट आणि मोठा गट अशी झाली.
या स्पर्धेसाठी लागणारे स्मृतिचिन्ह आणि अश्वथामा युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांना टी शर्ट नगरसेविका मीना वाझ यांनी प्रायोजित केले होते. त्याचप्रमाणे विविध देणगीदारांनी विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन स्पर्धा यशस्वी केली.या स्पर्धेसाठी टाईम किपर म्हणून आणि स्पर्धेचे सूत्रसंचलन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.स्पर्धा बघण्यासाठी फार मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

बातमी लेखन – महादेव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.