बेळगाव दि 25- राजस्थानच्या जयपूर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अपंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या अपंग खेळाडूस के पी सी सी माजी सदस्य शंकर मुनवळळी यांनी आर्थिक मदत केली आहे.
वीरभद्र नगर येथील रिजवाना आर जमादार(31) या अपंग खेळाडूस 24 हजार आर्थिक मदत केली आहे.
अत्यंत प्रतिकुल परीस्थीती असताना देखील हैद्राबाद येथील राष्ट्रीय अपंग स्पर्धेत 2 सुवर्ण,1 रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई करत बेळगाव शहराच नाव उजवल केलं होतं आगामी जयपूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तिला मदतीची गरज होती. मुनवळळी यांनी अपंग खेळाडूस मदत दिल्याने नवीन व्हील चेयर घेणार असून जयपूरला जाण्यास मदत होईल अशी मत रिजवाना ची आईनी व्यक्त केलं