मुंबई दि १०- १९ मार्च रोजी बेळगावात होणाऱ्या शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सवास मुंबई चे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना निमंत्रण देण्यात आला आहे . मुंबई महा पालिकेत बेळगावातील महाराष्ट्र महोत्सव आयोजकांच्या एका शिष्टमंडळाने शिव सेनेचे मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली .मराठी माणसाचं आणि अख्या महाराष्ट्राचं नाक असलेल्या मुंबईच्या महापौर पदी निवड झाल्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यांचं सीमा वासियांच्या वतीने अभिनंदन करण्यात आलं .यावेळी मदन बामणे ,सुनील बाळेकुंद्री ,गणेश दड्डीकर , रवी निर्मळकर ,सुरज कनबरकर उपस्थित होते .
बेळगावातील मराठा मंदिरात १९ मार्च रोजी शाहीर अमर शेख जन्म शताब्दी निमित्य महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आला असून विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत यावेळी बेळगाव च्या महापौर उपमहापौरा सह ३२ नगरसेवकांचा सत्कार देखील केला जाणार आहे .
Trending Now