मुंबई दि १०- बेळगाव जिल्ह्याला सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी स्थिती मूळ पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून यावर मात करण्यासाठी महाराष्ट्राने कृष्णा नदीतून दोन टी एम सी पाणी कर्नाटकला ध्याव अशी मागणी करण्यात आली आहे . मुंबई मुक्कामी कर्नाटक भाजप नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळान पाणी देण्याची मागणी केली आहे .
राज्य भाजप माजी प्रदेशाध्यक्ष प्रह्लाद जोशी अन राज्य सभा सदस्य प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुक्कामी भाजप शिष्ट मंडळान मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन कर्नाटकास पाणी देण्याची विनंती केली. कृष्णा नदी द्वारे महाराष्ट्राने कर्नाटकला दोन टी एम सी पाणी ध्यावे अशी मागणी केल्या नन्तर १ एप्रिल पासून कृष्णा नदी द्वारे कर्नाटकला दोन टी ए सी पाणी देऊ असा आदेश दिला असल्याचा आश्वासन फडणवीस यांना भाजप शिष्टमंडळास दिल आहे. महाराष्ट्र सरकारच्या या २ टी एम सी पाणी देण्याच्या निर्णयाने उत्तर कर्नाटकातील बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्याची पिण्याची पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटणार आहे. यावेळी आमदार महांतेश कवटगीमठ, शशिकला जोल्ले, राजू कागे, लक्ष्मण सवदी दुर्योधन ऐहोळे,खासदार पी सी गद्दीगौडर , अण्णासाहेब जोल्ले आदी उपस्थित होते .