Sunday, November 17, 2024

/

दहा मिनिट आधी ठरणार महापौर- सर्वाधिकार निवड समिती कडेच

 belgaum

बेळगाव दि १:मराठी माणसा जागा हो माणुसकीचा धागा हो रात्र वैऱ्याची आहे जागे रहा असा संदेश दिल्या प्रमाणे अज्ञात स्थळी गेलेल्या नगरसेवकांच्या बैठकांच सत्र रात्री उशीरा दोन वाजेपर्यंत चालूच होते..दोन गटात असेलेली कटुता विसरून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडल्या यात महापौर निवडीचे सर्व अधिकार निवड समितीला देण्यात आले. या नुसार बुधवारी दुपारी एक वाजता निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याच्या दहा मिनिटे आधी महापौर उपहापौर कोण ते ठरणार आहे.

दोन दिवसापूर्वी एका गटाने निवडीचे सर्व अधिकार आमदार संभाजी पाटील यांना दिलेले मात्र मंगळवारी रात्री पुन्हा गटाच्या नियमानुसार आमदार संभाजी पाटील यांच्यासह नगरसेवक किरण सायनाक,पंढरी परब ,अनंत देशपांडे,विजय पाटील रतन मासेकर यांना देण्यात आले आहेत . एका वरिष्ठ नगरसेवकाने बेळगाव लाइव्ह ला दिलेल्या माहिती नुसार महापौर पदासाठी मधुश्री पुजारी,मीनाक्षी चिगरे,संज्योत बांदेकर तर उपमहापौर पदासाठी मोहन भांदुर्गे नागेश मन्डोळकर या सर्वांचे अर्ज भरणार आहेत. निवड समितीने सर्व उमेदवाराकडून कडून अर्ज मागे घेण्यासाठी लेखी हमी घेतली आहे त्यामुळे शेवटच्या दहा मिनिटात या पाच मधील दोघांची निवड केली जाणार आहे.

दिनेश रावळ राकेस पलंगे याचं अभिनंदन

मराठ गटाच्या एकीसाठी उपमहापौर पदाच्या शर्यतीत असलेले राकेश पलंगे आणि दिनेश रावळ यानी माघार घेतल्याने सर्व मराठी नगरसेवकांनी दोघांच अभिनंदन केल आहे. मंगळवारी रात्री च्या बैठकीत नगरसेविका माया कडोलकर गायब होत्याआपण अज्ञात स्थळी बैठकांना जरी आओ नसलो तरी सभागृहात हजर राहून मराठी गटाला मतदान करू असा संदेश वरिष्ठ नागसेवाकाना दिला असला तरी त्यांच्या अनुपस्थिती बद्दल चर्चा होती.

sanjyot bandekar

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.