बेळगाव दि १० – बेळगाव शहरातील प्रसूती तज्ञ आणि स्त्री रोग विषेशज्ञ डॉक्टरांच्या घरावर आको क्लिनिक वर होणारे हल्ले रोखावेत आणि डॉक्टरांना बंदोबस्त पुरवावा अशी मागणी शहरातील डॉक्टरांनी केली आहे .
शुक्रवारी सकाळी निवासी जिल्हाधिकारी बसवराज इटनाळ यांना निवदेन देऊन सदर मागणी करण्यात आली आहे . गेल्या आठवड्यात सराफ गल्ली शहापूर येथे डॉ उमदी यांच्या हॉस्पिटल वर मृतक महिलेच्या नातेवाईका कडून हल्ला करण्यात आला होता या घटनेमुळे शहराती स्त्री रोग तज्ञ घाबरले आहेत त्यामुळे सर्वाना सुरक्षा ध्यावी अशी मागणी करण्यात आली आहे . यावेळी डॉ स्वाती वैद्य, डॉ एम सी मेटगुड,डॉ श्रीदेवी मेटगुड, डॉ गिजरे, डॉ बी आर देसाई आणि सहभागी झाले होते