बेळगाव दि 25 -बेळगावात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याच्या बाबतीत खासदार सुरेश अंगडी पिछाडीवर पडले आहेत. या बाबतीत कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य खासदार संभाजी राजे छत्रपतींनी बाजी मारली असून अंगडींना हरविले आहे
आज कोल्हापूरच्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन आहे. केंद्राकडून मंजुरी मिळवून पहिल्या लॉट मध्ये हि सोय मिळवण्यात कोल्हापूरकर सरस ठरले आहेत. बेळगावचे सेवाकेंद्र तिसऱ्या टप्प्यात सुरु होणार आहे. बेळगावकर जोरदार मागणी करीत असताना इतका विलंब होण्यास खासदारांचा नाकर्तेपणाच कारणीभूत ठरला असावा का, हा प्रश्न आहे.
उशिराने सुरु होणाऱ्या बेळगावच्या सेवा केंद्राचे उदघाटन कधी हे अजून कळविण्यात आले नाही.
बेळगाव पोस्ट कार्यालयात पास पोर्ट केंद्राची सुरुवात पहिल्या टप्प्यात होणार होती आता ती तिसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूर पास पोर्ट कार्यालय तिसऱ्या टप्प्यात होणार होते ते पहिल्या टप्प्यात शनिवार 25 मार्च रोजी होत आहे.दिल्ली दरबारी बेळगावच्या खासदारांचे वजन कमी पडलं की काय याची चर्चा होताना दिसत आहे.पास पोर्ट कार्यालय बेळगावात सुरू व्हावं यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष फोरम, सतीश तेंडुलकर आणि माजी महापौर सरिता पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते मात्र लोक प्रतिनिधींच सुरुवातीला याकडे दुर्लक्ष होतं.
Angadi saheb jamaty Tari kay