बेळगाव दि ११-दिवसेंदिवस बेळगावातील के एल ई हॉस्पिटल हायटेक होत असून अनेक अत्याधुनिक सुविधां असलेले या भागातील मोठे हॉस्पिटल म्हणून नामचीन होत आहे . या हॉस्पिटल मध्ये रूग्णा साठी हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष,राज्य सभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे यांनी दिली आहे .
कर्नाटकात बंगळूरू येथे हार्ट ट्रान्सप्लांट या ठिकाणी हार्ट ट्रान्सप्लांट सुविधा होती मात्र बेळगावातील के एल ई मध्ये ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने उत्तर कर्नाटकातील आणि दक्षिण महारष्ट्र गोव्यातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे.. हार्ट ट्रान्सप्लांट सोबत लिवर आणि किडनी ट्रान्सप्लांट सुविधा देखील या हॉस्पिटल मध्ये केली जाणार आहे यासाठी हायटेक असे ओपेरेशन थियेटर बनविल गेल आहे अस देखील कोरे म्हणाले .
हार्ट ट्रान्सप्लांट साठी सुमारे ५ लाख ,किडनी ट्रान्सप्लांट साठी साडे तीन लाख तर लिवर ट्रान्सप्लांट साठी सुमारे दहा लाख खर्च येणार असून देशातील इतर खाजगी हॉस्पिटल पेक्षा हा खर्च कमी असणार आहे अस देखील कोरे यांनी कळवील आहे. आमदार महांतेश कवटगीमठ , डॉ सलधाना ,डॉ जाली .डॉ संतोष हजारे ,डॉ नेरली यांच्यासह अन्य उपस्थित होते.