बेळगाव दि ४ : चंद्रशेखर गायकवाड लिखित ‘कळा लागल्या जीवा’ या कविता संग्रहाच प्रकाशन डॉ प्रा संध्या देशपांडे यांनी केल. लोकमान्य ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात डॉ चंद्रशेखर गायकवाड,अशोक याळगी उपस्थित होते. प्रारंभी अशोक अल्गोंडी चंद्रशेखर गायकवाड यांच्या बहारदार कवितांचा कार्यक्रम झाला. समाजातल्या वेदना व्यवस्था आणि सामाजिक भान असणाऱ्या कविता सादर केल्या .
यावेळी बोलताना संध्या देशपांडे म्हणाल्या की कवींनी आपल्या कवितेतून समाजाच चित्रण अल पाहिजेत अश्या स्वरूपाच्या कविता लिहाव्यात तसेच कविता गडबडीत न लिहिता दीर्घ काळ त्याची पूर्णत्वाकडे जाण्यासाठी वाट पहावी अस मत व्यक्त केल. यावेळी शब्द गंध कवी मंडळ आणि बुक लवर्स क्लब सदस्य उपस्थित होते. किशोर काकडे यांनी आभार मानले.