बेळगाव दि २: मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट लोकप्रियता लक्षात घेत कन्नड भाषेत सैराट चित्रपटा चा रिमेक बनवण्यात आलाय.रॉकलाईन वेंकटेश आणि झी टाकीज यांच्या संयुक्त निर्मितीने मनसु मल्लिगे हा रिमेक बनवला गेला असून शुटींग पूर्ण झाल असून मार्च महिन्यात हा चित्रपट रिलीज व्हायची शक्यता आहे .
मनसु मल्लिगे द्वारा कन्नड फिल्म इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच अजय अतुल संगीत देत असून या चित्रपटात रिंकू राजगुरू च आर्ची च्या भूमिकेत चमकणार आहे. मराठी असलेल्या रिंकू ने कन्नड भाषेत कसे संवाद केलेत कसा अभिनय केलाय हे औत्सुक्याच विषय असणार आहे . सुर्यवंशम बजरंगी भाईजान आणि कन्नड चंद्र चकोरी सारखे हिट सिनेमे बनवणारे लव स्टोरी स्पेशालीस्ट एस नारायण यांनी दिग्दर्शन केल असून बंगलोर, मैसुरू ,आणि हैद्राबाद मध्ये या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आल आहे. कन्नड सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सत्य प्रकाश यांचा मुलगा निशांत या चित्रपटाद्वारे पदार्पण करत असून परश्या म्हणजे मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे मनसु मल्लिगे कर्नाटकात सैराट होणार का याकडे लक्ष लागल आहे .
मनसु मल्लिगे ला बेळगाव जिल्ह्याचा टच असून गोकाक तालुक्यातील अंकलगी गावचे सुपुत्र महांतेश डोणी या चित्रपटात कॉलेज मधील लेक्चरर ची भूमिका साकारत आहेत.कन्नड भाषेत मनसु मल्लिगे देखील सैराट हिट होईल कारण रॉकलाईन वेंकटेशयांची निर्मिती म्हणजे हिट तर एस नारायण हे दिग्दर्शक प्रेम कथा स्पेशालीस्ट आहेत या शिवाय आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू कन्नड मधील कसा परफॉरमन्स असू शकतो याची लागलेली उत्सुकता यामुळे या सैराट रिमेक नक्कीच यश मिळेल अशी मत महांतेश डोणी यांनी व्यक्त केलय . मनसु मल्लिगे बेळगाव शहरातील आधुनीकरण केलेल्या प्रकाश ४के नवीन चित्रपट गृहात रिलीज व्हायची शक्यता आहे .