बेळगाव दि १ -मराठी भाषिक महापौर उपमहापौर झाल्याने तीळपापड झालेल्या मुठभर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालिके समोर आंदोलन करत आपला कडू शमवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस बंदोबस्तात हैदोस घालणारे कन्नड रक्षण वेदिकेच्या महा भागानी आपल्याच स्थानिक आमदार खासदार आणि कन्नड नगरसेवकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मुळात ३२ नगरसेवकांची अभेध्य एकी असल्याने कन्नड उर्दू नगरसेवक आणि भाजप कॉंग्रेस चे खासदार आमदार लोकप्रतिनिधी सगळ्यांनी मतदाना केले तरी ३१ आकडा पार होत नव्हता त्यामुळे काहीच ना इलाज कन्नड उर्दू नगरसेवकांना एक व्हा म्हणणाऱ्या कानडी संघटनांनी आत्म परीक्षाची गरज आहे अशी आंदोलन स्थळी उपस्थितात चर्चा होती. एकीकरण समितीचा फक्त एक आमदार ३२ नगरसेवकांना भावनेच्या आधारावर एकत्रित ठेवतात त्या उलट दिग्गज दोन माजी मंत्री विध्य्मान खासदार आणि सत्ताधारी पक्षातील उर्दू भाषिक आमदार हे सगळ पाहत बसतात त्यांच्या डोळ्या देखत मराठी भाषिक नगरसेवक विजयी पताका फडकावतात याला निव्वळ मराठी अस्मिता मराठी मन मराठी भावनेचा हुंकार म्हणायला हवे आता तरी कन्नड भाषिकांनी बेळगाव वर मराठीचे वर्चस्व आहे हे मानायला हवे कारण मराठी माणूस कानडी भाषेच्या विरोधात नाही तर मराठी वर होणाऱ्या अन्याय विरोधात आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय