बेळगाव दि ६ : ग्रीन सेव्हियर्स टीम कडून सतत ४८ व्या रविवारी तब्बल ८५० झाडांची लागवड करण्यात आली. शहरात ग्रीन झोन समजल्या किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या परिसरात या झाडाचं रोपण करण्यात आल आहे.
या टीम ने मियावकी रोपण पद्धतीचा वापर करत ८५० झाड लावली आहेत या पद्धतीनुसार कमी जागेत जास्तीत जास्त दाट अरण्य कसा करता येईल याचा उपयोग होतो तसच या नुसार तीन वर्षात दाट अरण्य तयार होते. एप्रिल २०१६ पासून ग्रीन सेवियर्स ने हा उपक्रम राबविला असून शहरातील विविध ठिकाणी ३००० हून अधिक झाड लावून जगवली आहेत. दाट अरण्ये कमी वेळेत करण्यासाठी कमी जागेत करण्यासाठी मियावकी रोपण पद्धतीचा वापर शहराच्या सभोवताली अनेक ठिकाणी करण्यात आला आहे.
ग्रीन सेव्हियर्स च्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मदतीने हे पर्यावरण पूरक काम झाल आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचार्यांनी देखील योगदान देत ३०० झाड दिली आहेत या शिवाय होर्टीकल्चर विभागान देखील कामात योगदान दिल आहे.
ग्रीन सेव्हीयर्स संपर्क : 09611313919
मेल आय डी :[email protected]
Website: www.greensaviours.org