Sunday, December 22, 2024

/

कन्नड सैराट ग्लोब मध्ये झळकणार शुक्रवार दि ३१ पासून प्रदर्शन

 belgaum

अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्चीBgm globe aarchi)च्या अभिनयाने नटलेला आणि मुळ सैराटची कन्नड प्रतिकृती म्हणजेच कन्नड सैराट येत्या शुक्रवार दि ३१ पासून बेळगावच्या ग्लोब थिएटर मध्ये दाखल होणार आहे.
ग्लोब ने मराठी सैराट चा अक्षरशः विक्रम केला होता. येथे सैराट पाहून युवापिढी सैराट होत होतीच शिवाय इतर वर्गानेही या चित्रपटाचा अनुभव घेऊन आनंदच मानला, आता कन्नड सैराट कसा असेल याची उत्सुकता आहे ती ३१ रोजी पूर्ण होईल.
अर्चि रिंकुचा अभिनय, तिच्या तोंडचे कन्नड संवाद, अजय अतुल यांचे संगीत आणि कन्नड दिग्दर्शक व निर्माते रॉक लाईन वेंकटेश यांची नवी प्रयोगशीलता असा संगम मनसु मल्लिगे या चित्रपटात पहायला मिळणार, मग चला तर आजच तिकीट बुक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.