बेळगाव दि ४ :बेळगाव परिसरात शेतकरी पुढील हंगामाच्या तयारीला लागले असून आपली जमीन कशी सुपीक कसदार होण्यासाठी शेतात बकरी बसविण्यास प्रारंभ केला आहे. धनगर बकऱ्यांच्या समूहासह शेतात वस्ती रहातात त्याला बकरी बसविणे म्हणतात.
शेता मध्ये बकरी बसविल्या मुळे रात्रभर जी बकरी शेतात वास्तव्य करून असतात त्या बकऱ्यांच्या मुत्र आणि विष्ठेमुळे उत्तर शेणखत तयार होत असते आणि जमिनीला मिळत असते त्यामुळे जमीन सुपीक कसदार बनण्यास मदत होत असते यामुळे बकरी बसविलेल्या धनगराचा दिवसाचा खर्च निघून येत असतो या बदल्यात शेतकऱ्यास शेणखत मिळत असते . बकरी बसविण्याची परंपरा चालत आली आहे यामुळे शेतकरी आणि धनगर दोघही एकमेकास मदत करत असतात .
बकऱ्यांच्या पिल्लाना धनगरा कडून मिळते आईची माया
एका धनगरा कडे साधारण ४०० ते ५०० बकरी असतात त्यातील अनेक बकऱ्याना दोन आणि त्यापेक्षा अधिक पिल्ल असतात. या बकऱ्यांच्या पिल्लांची निघा धनगर जणू काही आपल बाळ असल्या सारखी घेत असतो. बकऱ्याच्या समुहात असलेल्या पिल्लांनाबकरी देत असलेल दुध पुरत नसल्याने इतर बाहेरच पौष्टीक आहार देत असतात. भुईमुग शेंगाच्या तेल काढल्या नंतर उरलेली जी पेंड असते त्याचा जनावरांना दुध वाढवण्यासाठी वापर होत असतो ती पेंड आणि रवा पाण्यात घालून रात्र भर भिजत ठेवतात आणि सकाळी उठून सगळ्या बकऱ्यांच दुध काढतात त्यानंतर दुध पेंड आणि रवा मिसळून त्याची तयार झालेली जाड दुधासारखी पौष्टिक खीर तयार होते त्याला बाह्य फूड म्हणून त्या पिल्लांना पाजवतात. बकऱ्याच्या पिल्लांना दुध म्हणून बाह्य पौष्टिक भरवण्याची ही आगळी वेगळी पद्धत आहे.
शहापूर येथील माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी गेली चार दिवस आपल्या शेतात बकरी बसवलेली आहेत. शिन्दोळी भागातील धनगरांनी ही बकरी बसविलेली आहेत त्यावेळी बेळगाव लाईव्ह ने बकरी आणि बाह्य दुध या गोष्टी चा अभ्यास केला.
बकरी बसवल्याने सूपीक जमीनीचा कस वाढतो हि समजूत आहे.काय झालय कि आता कमी खर्चात जास्त उत्पन्न मीळवण हे फ्याड चाललय.तूम्ही जर एकरी तीन किंवा चार ट्याक्टर ट्राली उत्तम कूजलेले शेनखत जर पसरुन जर जमीनीची मशागत केली की खरीप आणी रब्बी दोन्ही पीक जोमाने येतात.परत एक वर्ष कमी खत घातलेतरी चालत.परत मुत्राने जमीनीच नत्र वाढत.त्यासाठी म्हैस किंवा गाईचे मुत्र शेतात पसरल तरी चालत.पण आता हे कूणाला नको झालय.
दुसरी बाजू पाहिल्यास इकडे शहापूर,येळ्ळूर,वडगाव शिवारात धनगर आपली बकरी उभ्या पीकात घालून शेतकर्यांच नूकसान करत आहेत याने शेतकरी हैरान होऊन पोलिस ठान्यात तक्रार देन्याच्या तयारीत आहेत.