बेळगाव दि ५ : बेळगाव शहरात नवीन अस्तित्वास आलेल्या माजी नगरसेवक संघटनेच उद्घाटन मंगळवारी ७ मार्च रोजी करण्यात येणार आहे . हिंदवाडी येथील आय एम ए सभागृहात सायंकाळी साडे चार वाजता या उद्घाटन कार्यक्रमाच आयोजन केल असून नागनुर श्री सिद्धराम स्वामीजी उद्घाटक म्हणून तर पोलीस आयुक्त टी जी कृष्णा भट्ट आणि जिल्हाधिकारी एन जयराम, पालिका आयुक्त एम शशिधर कुरेर प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत . माजी नगर सेवक संघटनेच्या अध्यक्ष पदी वकील नागेश सातेरी अध्यक्ष तर सिद्दनगौडा पाटील कार्याध्यक्ष , दीपक वाघेला सचिव तर नेताजी जाधव , शांतीनाथ बुडवी सह सचिव , गोविंद राऊत , एन बी निर्वाणी, शिवाजी सुंठकर, धनराज गवळी लातीफ खान पठाण हे उपाध्यक्ष असणार आहेत. या कार्यक्रमात नूतन महापौर संज्योत बांदेकर उपमहापौर नागेश मंडोळकर यांचा सत्कार केला जाणार आहे .
Less than 1 min.
Previous article
Next article