महानगरपालिकेची निवडणूक गाजली ती कन्नड महापौर करण्याचा आटापिटा करणाऱ्या मंडळींचे मनसुबे धुळीला मिळाल्यामुळे. मराठी नगरसेवकांत फूट पाडून आपले स्वार्थ साधू पाहणाऱ्यांची पुरती हार पाहायला मिळाली आहे.
ज्या उर्दू नगरसेवकांच्या जीवावर स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न काहींनी केला त्यांना या गटातील फुटीचा फटका बसलाय शिवाय त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्नही निर्माण झाला तो वेगळाच, उर्दू नगरसेवकांची एकूण संख्या ६ आहे. त्यापैकी तिघे लखन आणि रमेश जार्किहोळीच्या गटात आहेत. उरलेले तिघे सतीश जार्किहोळी आणि फिरोज शेठ यांच्या गटात आहेत. मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारी मंडळी दोन गटात विभागल्याने आमदार फिरोज सेठ सध्या अडचणीत आले आहेत.
उत्तर मतदारसंघाचे स्वप्न पाहणारे वाढू लागले आहेत, काही कन्नड आणि उर्दू नगरसेवकांना हाताशी धरून लखन जार्किहोळी उत्तर मध्ये आपले वर्चस्व वाढवू लागले आहेत. यामुळे आत्ता सेठ विरुद्ध लखन ही नवी लढाई सुरू झाली आहे.
नुकताच झालेल्या सकल मराठा आणि मराठी मोर्चाची धग आणि त्यामुळेमहा पालिकेत मराठी नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी झालेली धडपड चांगले फलित देऊन गेली आहे,याचे श्रेय काही प्रमाणात पंच मंडळी युवा कार्यकर्ते आणि उद्योजकांना ध्याव लागेल. मराठी वोटबँक तर घट्ट झालीच शिवाय सीमाप्रश्नाच्या सुप्रीम कोर्टातील खटल्यातही याचा चांगला उपयोग होऊ शकणार आहे.
भाजपचे खासदार सुरेश अंगडी आणि आमदार संजय पाटील यांनी उपस्थित राहून मतदान केले असते तरी काहीच फरक पडला नसता, मात्र त्यांनी अनुपस्थितीत राहून मदत केली नाही याची खंत कन्नडीगात मोठा चर्चेचा विषय आहे. यामुळे पुढील आमदारकीच्या निवडणुकीत पारडे मराठीच्या बाजून असेल हे नक्की.