बेळगाव दि 28-मागील विधान सभा निवडणुकीत दुही चा फटका ग्रामीण मतदार संघात समितीला सहन करावा लागला या साठी पुढील विधान सभा सीमा भागात एकीने लढू असा विश्वास दक्षिणचे आमदार संभाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे.
गुडी पाडव्या निमित्य धामणे येथे बैलगाडी शर्यती चे आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीच उदघाटन केल्या वर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी माजी आमदार मनोहर किनेकर, समिती चे एस एल चौगुले,एल आय पाटील, महेश जुवेकर, रावजी पाटील, नितीन खननुकर आदी उपस्थित होते .
विधान सभा निवडणूक एक वर्षानंतर आली असून जस राष्ट्रीय पक्ष कामाला लागले आहे तसं समिती ने देखील निवडणुकीच्या तयारी ला लागलं पाहिजे. आगामी निवडणुकीत समितीचे दोन चे पाच आमदार निवडून येण्यासाठी प्रयत्न करू असे देखील आमदार पाटील म्हणाले.
बैलगाडी शर्यती चा आज पहिला दिवस होता सतत तीन दिवस शर्यत चालणार असून धामणे येथील यल्लप्पा रेमानाचे यांच्या पुढाकारातून शर्यतीच आयोजन करण्यात आलंय