गुडी पाडव्या निमित्त शुभेच्छा देणारा एक फोटो सोशल मीडिया वर व्हायरल झाला असुन या फोटोत दोघे आहेत. मात्र कोण कुणास शुभेच्छा देत आहे हे स्पष्ट नसल्याने चर्चेचा विषय बनला आहे.फोटो फलक कुणी कार्यकर्त्यांनी वायरल केलाय नेत्यांनी करवून घेतलाय हे देखील स्पष्ट नाही .
मराठी नेत्यांचे असे कानडी नेत्यांबद्दलचे आकर्षण कितपत योग्य? हा प्रश्न अनेकांना पडलाय असे कळाले, तुम्हाला काय वाटते?
राजकीय मैत्री पोटी असे फोटो आणि शुभेच्छा संदेशाची देवाण घेवाण होऊ शकते मात्र बेळगाव शहराचं मानाचं दुसऱ्या नागरिकत्वाचं पद भोगत असलेल्या उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी स्वतःला आवरण्याची गरज आहे अशी भावना लोकांतून व्यक्त होताना दिसत आहे. मागील दोन वर्षा पूर्वी तात्कालीन महापौर किरण सायनाक यांनी त्या वेळेचे पालक मंत्री सतीश जार्किहोळी यांचे अनेक फलक लावले होते त्याचीच री मंडोळकर ओढत आहेत काय? गुडी पाडव्याच्या शुभेच्छा देताना लखन जार्की होळी यांचा फोटो वापरून उपमहापौर बेळगाव करांना कोणता संदेश देत आहेत ? याबद्दल चर्चा सुरु आहे.
Trending Now