बेळगाव दि 22-आर पी डी कॉलेज रोडवर एका स्कुटीवर चार विद्यार्थिनी अगदी बिनधास्तपणे जात होत्या, वास्तविक रोज अपघातांची मालिका चालू असून देखील हे बिनधास्तपणे चालतय, याला जबाबदार कोण? पालक, शिक्षक, विध्यर्थी, समाज, पोलीस कि आणि कोण?
माझ्या मते याला जबाबदार हे प्रथम पालकच आहेत, आपल्या मुलाला, मुलीला कितपत सवलत द्यावी हे पालकांनी ठरवले पाहिजे,
दुसरे जबाबदार म्हणजे पोलीस, बेळगाव शहरात हे राजरोसपणे मुख्यत्वे करून जिथे जिथे कॉलेज आहेत त्या एरियात तरी हे बिनबोभाट चालू आहे.जरी रोजच्या रोज वाहनांची तपासणी करून त्याच ठिकाणी त्याच्या पालकांना बोलावून पालकांच्या नावाने गुन्हा दाखल करावा, व कोर्ट प्रक्रिया चालू करावी तरच अशा गोष्टीला आळा बसेल.
नाहीतर रोज वर्तमान पत्रात वाचायचे की पुन्हा आज एक अपघात दोन विध्यार्थी जागीच ठार,……….
बातमी लेखन -महादेव पाटील