चंदगड दि १२ : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मधील महिपाळगडचा शहिद जवान महादेव तुपारेला सैन्यदलातर्फे अखेरची मानवंदना देण्यात आली. शासकीय इतमामात अंतिम संस्काराचा विधी पार पडला.
श्रीनगरमधील लेह मध्ये 8 मार्च रोजी कुमाव रेजिमेंटमधील जवान महादेव तुपारे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडून ठार झाले. काल सरकारनं ते शहिद झाल्याची घोषणा केली. रविवारी सकाळी त्यांच पार्थिव महिपाळगड या मूळ गावी आणण्यात आल. पार्थिव त्याच्या घरी येताच पत्नी आणि आई वडिलांना शोक अनावर झाला होता.
आज शहिद तुपारे अमर रहे च्या घोषणात पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली . आणि प्रादेशिक सेनेच्या आणि पोलिस दलाच्या जवानानी बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना दिली. पार्थिवाला जवानाचा भाऊ पुंडलिक यांनी अग्नी दिली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अमित सैनी, आमदार संध्यादेवी कुपेकर आणि सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकात पाटलांनी राज्यशासनातर्फे शहिद जवानाच्या कुटुंबाला आठ लाख रूपयाच्या मदतीची घोषणा केली. शहिद जवानाच्या पत्नीचा आक्रोश मन हेलावणारा होता. आजूबाजूच्या गावातील हजारो लोक शहिदाला अखेरची मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्या कडून बूट घालून आदरांजली
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी तुपरेंच्या कुटुंबियांना शासकीय मदत जाहीर केली.दरम्यान यावेळी सैन्यदलाच्या वतीने मानवंदना देताना एका जवानांच्या बंदुकीतून चुकून गोळी पार्थिवाच्या दिशेने गेल्याच प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली तर जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी बूट घालून आदरांजली वाहल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे पोलीस अधीक्षक अन्य शास कीय अधिकाऱ्यांनी बूट काढून पुष्पचक्र वाहिले मात्र जिल्हाधिकारी सैनी यांनी बूट घालून केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली .