बेळगाव दि 12: शहर गुन्हा अन्वेषण शाखेने शहापूर हट्टी होळी गल्लीतील आणि भवानी नगर येथील दोन दुकानावर धाड टाकून गांजा नशा आणणारी पूड आणि भांग च्या गोळ्या जप्त केल्या आहेत .होळी निमित्य भांग आणि थोडया प्रमाणात झिंग आणणाऱ्या वस्तु ना मागणी असते . या दोन दुकानावर धाड टाकुन अडीच किलो भांग चया गोळ्या इतर नशेच साहित्य जप्त केल आहे. हट्टी होळी गल्ली येथील आशीर्वाद इलेक्ट्रॉनिक्स चे मालक मुरली बसवंतीलाल शर्मा, भवानी नगर गणेश मंदिरा जवळील मनीष शर्मा यांना गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली आहे .
भवानी नगर येथील दुकानातून मनीष शर्मा नशेचे अमली पदार्थ विकत होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे . सी सी बी पोलीस निरीक्षक गोदीकोप्प यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली असून रविवारी रात्री उशीर पर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.