बेळगाव दि १० -महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अव्हेरल्या गेलेल्या बेळगावच्या वकील ज्योती पाटील यांना अखेर न्याय मिळाला आहे. दि १५ रोजी त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल सर्वप्रथम बेळगाव live ने आवाज उठवला होता.
जागतिक महिला दिनाच्या दिवशीच बेळगावातील एका महिला वकिलावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने अन्याय केला होता. दिवाणी न्यायाधीशाच्या तोंडी मुलखाती साठी त्या मुंबईत गेल्या असता क्षुल्लक कारण पुढे करून लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी परीक्षा देण्यास मनाई करून अपात्र ठरविले होते.
मुंबई येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी या तोंडी परीक्षांचे आयोजन महर्षी कर्वे रोड मुंबई येथील लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात करण्यात आले होते. आत्ता त्याच ठिकाणी त्यांना पुन्हा मुलाखतीस बोलावण्यात आले आहे.
त्या न्यायाधीश परीक्षेस गेल्या होत्या यावेळी प्रमाण पत्रांची छाननी करताना त्यांना तोंडी परीक्षा देण्यास अपात्र ठरविण्यात आले होते.
राज्य लोकसेवा आयोगाच्या दोन परीक्षा ज्योती पाटील उत्तीर्ण झाल्या आहेत मात्र शेवटी तोंडी परीक्षा देण्यास त्यांना मनाई केल्याने त्यांच्यावर अन्याय झाला होता. यामुळे सीमा भागात प्रचंड नाराजी व्यक्त झाली होती.
महाराष्ट्र कणकवली आमदार नितेश राणे यांच्यासह महाराष्ट्रातील मिडियान या प्रकाराची बेळगाव live वरून माहिती मिळाल्यानंतर गांभीर्याने दखल घेतली होती. याचा सकारात्मक परिणाम पहावयास मिळाला आहे.
अतिशय अल्पकाळात बेळगाव live ने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
belgaon live che khup khup abhar ani dhanyawad …..ani jyoti patil taai sathi shubhechhya all d best tai…!!!
Very good jyoti nd thanks to media who supported her on time .