क्रिकेट या खेळाने साऱ्या जगाला वेड लावले आहे. क्रिकेटचा सामना सुरु झाला की सगळे रस्ते ओस पडत असतात. या खेळातले नेम आणि फेम साऱ्यांनाच आकर्षित करते, यामुळे प्रत्येक आईवडीलांना आपलाही मुलगा उत्कृष्ट क्रिकेटपटू व्हावा असे वाटत असते, मात्र साऱ्यांनाच ते जमते असे नाही.
बेळगाव मधील विजया क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेणारा आणि सेंट झेवियर्स मध्ये चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या मणिकांत बुकीटकार नावाचा केवळ 10 वर्षाचा चिमुकला क्रिकेटर 20 ते 22 वर्षाच्या बोलर्सची बॉलिंग धैर्याने खेळतो आहे. त्याला बेळगावचे रमाकांत आचरेकर अर्थात रवी मालशेठ घडवत असून त्यांच्या हातून एक नवा सचिन आकार घेत आहे.
रवी मालशेठ हे क्रीडा प्रशिक्षक आहेत. फावल्या वेळेत उदयोन्मुख क्रीडापटूच्या बातम्या देऊन ते प्रोत्साहन देतात, विजया अकादमीचे ते संचालक आणि फुल टाईम कोच आहेत. आजवर त्यांनी अनेक खेळाडू घडविले, मणी मधील स्पार्क त्यांनी ओळ्खलाय यामुळेच त्यांनी त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे.
कोण आहे हा मणिकांत बुकीटकार? तो आहे केवळ 10 वर्षांचा चिमुकला. मात्र तो त्याच्या वयाच्या दुप्पट असणाऱ्या बेळगावातील दिगग्ज गोलंदाजांचे बॉल फोडून काढतो. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या बुटक्या बुकीटकार ने सचिनचा आदर्श घेतला आहे.
मणिकांत ची खेळण्याची पद्धत बघुन कर्नल दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी चे त्याला निमंत्रण मिळाले आहे इतकेच नव्हे तर नुकताच हुबळी मध्ये अनिल कुंबळे टॅलेन्ट हंट मध्ये कुंबळे नी सुद्धा त्याचे विशेष कौतुक केले आहे. वेंगसरकर आणि अनिल कुंबळे सारख्या दिग्गज क्रिकेटपटूनी मणि ला पारखले आहे सध्या दररोज तो सेन्ट झेवियर्स मैदानावर सकाळी 2 तास आणि सायंकाळी 2 तास प्रशिक्षक रविशंकर मालशेट यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे
इतक्या लहान वयात मणिने केलेल्या या कामगिरिसाठी त्याचे वडील शिवानंद यांचं सततचं प्रोत्साहन देखील मोलाचं आहे.
अक्टोंबर महिन्यात गोव्यात झालेल्या 16 वर्षा खालील बाळू नाईक राष्ट्रीय स्पर्धेत नाशिक ,जोधपूर आणि लखनौ विरुद्ध खेळताना तीन सामन्यात आपल्या जादुमय फिरकीने 12 गडी बाद केले होते तर बंगळुरु येथे 12 वर्षा खालील निमंत्रितांच्या स्पर्धेत नाबाद 124 धावा करत शतक झळकावल होत .
बेळगावात अद्याप आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू तयार झालेला नाही मात्र मणिकांत सारख्या खेळाडू कडून अपेक्षा आहेत.