Monday, December 30, 2024

/

पालिकेत काँग्रेस समिती भाऊ अन मिळून खाऊ-खासदार अंगडी

 belgaum

Bgm bjp mpबेळगाव दि 25- भाजप खासदार सुरेश अंगडी यांची पुन्हा एकदा जीभ घसरली असून त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती बद्दल जहरी टीका केली आहे. एक मराठा लाख मराठा असा उल्लेख करत महापालिकेत एकीकरण समिती काँग्रेस हे दोघे भाऊ भाऊ असून दोघे मिळुन खाऊ असं जाहीर रित्या वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

शनिवारी सायंकाळी महंत भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नूतन भाजप महा नगर अध्यक्ष राजेंद्र हरकुनी यांच्या पदभार ग्रहन कार्यक्रमात सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. महा पालिकेत काँग्रेस आणि एकीकरण समिती चे नगर सेवक मिळून भाऊ भाऊ खाऊ करत आहेत अशी टीका करत आगामी महा पालिका निवडणुकीत सर्व भाजप चे नगरसेवक निवडून आणा पालिकेत भाजपा ची एकहाती सत्ता आणा असं आव्हान त्यांनी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना केलं आहे. मराठी भाषिकांच्या मतावर निवडून येऊन अंगडी यांनी अनेकदा एकीकरण समिती वर जहरी टीका करून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. बेळगाव भाजप च्या आजी माजी लोक प्रतिनिधीनी केलेला भ्रष्टाचार अंगडी यांना दिसत नाही का हा प्रश्न यावेळी विचारला जात आहे.

पहिला वाजपेयी कधी येदूरप्पा तर कधी मोदीं च्या प्रभावामुळं यांनी खासदारकी मिळवलीय त्यात मराठी भाषिकांनी त्यांना मत दिलीत हे त्यांनी विसरू नयेत महा पालिकेत मराठी भाषकांची सत्ता असल्याने खासदारांच्या पोटात दुखत आहे त्यामुळे निराशेतुन अत्यंत बालिश पणाच वक्तव्य करत त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती वर टीका केली आहे.मराठी नगरसेवक या नात्यानं अंगडी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया नगरसेवक अनंत देशपांडे यांनी बेळगाव live कडे नोंदवली आहे.

भाजप पद ग्रहण कार्यक्रमात सामील सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून सदर बातमी बनविण्यात आली असून अंगडी यांनी याबाबत काही स्पष्ट केलेल नाही

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.