बेळगाव दि २३- सीमा प्रश्नाचा सुप्रीम कोर्टातील खटला सध्या निर्णायक वळणावर असताना, आणि कर्नाटकातील विधान सभा निवडणुका एक वर्षावर येऊन ठेपल्या असताना मराठी माणसाच नेतृत्व करणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच अध्यक्ष पद रिकाम असण कितपत योग्य आहे असा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. माजी आमदार मध्यवर्ती अध्यक्ष कै वसंतराव पाटील यांच्या निधनाला वर्षाचा काळ पूर्ण होत आला तरी देखील पद रिक्त ठेवणे दुर्दैवाची बाब आहे.
माजी मंत्री जेष्ठ नेते एन डी पाटील यांनी वसंतराव पाटलांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात मध्यवर्ती नवीन अध्यक्ष सर्व समावेशक असेल त्याची लवकरच निवड करू अस सुतोवाच्य केल होत मात्र अध्याप अध्यक्षाची निवड झाल्याने मोठे निर्णय घेण्यास अडचण होत आहे त्यामुळे मध्यवर्ती अध्यक्ष निवडण्यास दिरंगाई का ? असा प्रश्न देखील पडू लागला आहे.बेळगावातील इतर राजकीय पक्ष पुढील निवडणूक डोळ्या समोर ठेऊन जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत मात्र एकीकरण समितीच्या गोटात शांतता आहे संघटनात्मक दृष्ट्या इतर पक्षांची बांधणी जोरात सुरु आहेत समितीचे मात्र सामसूमच आहे.
अलीकडे झालेल्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्चामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना मराठी भाषिकांनी मतभेद विसरून मोर्चात दाखविलेला सहभाग अशी वातावरण निर्मिती असताना या सर्वच लाभ घेण्याची संधी समितीला चालून आली असताना मोठ पद रिक्त ठेवणे एकीकरण समिती सारख्या संघटनेला शोभणारे नाही. युवकांच्या दबाव गटाने मध्यवर्ती अध्यक्ष निवडण्यासाठी दबाव टाकला असला तरी समिती नेतृत्वाने याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतय. मध्यवर्ती समिती नेत्यांनी तातडीची बैठक बोलावून लवकरात लवकर अध्यक्ष निवडीचा अंतिम निर्णय घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यातून होत आहे.