बेळगाव दि 13 -दोन दुचाकींची आमोरा समोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात हालगा येथील महाविध्यालयीन युवक ठार झाल्याची घटना रविवार दुपारी 12च्या सुमारास बैलूर क्रॉस जवळ घडली आहे . सुशांत शहापुरे 21 असं हालगा ता. बेळगाव येथील ठार झालेल्या युवकाच नाव आहे.
या घटने बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हलगा येथील मृतक सुशांत शहापुरे ,किरण हणमंताचे (21)यांच्यासह 10 ते 12 मित्राचा एक ग्रुप सुशांतच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी सूरल ला जात होते तर किणये ता. बेळगाव येथील ज्ञानेश्वर पाटील , शुभांगी पाटील व कौस्तुभ पाटील हि सखी भावंड बैलुर क्रॉस जवळ आपल्या शेतातील काजू गोळा करून घरी वापस येत असताना बैलूर क्रॉस जवळ ज्ञानेश्वर व सुशांत यांच्या दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली त्यात सुशांत चा मृत्यू झाला आहे तर शुभांगी गंभीर जखमी झाली आहे.
बेळगाव जांबोटी हा रोड मृत्यू साफळा बनला असून या रॉड वर अपघाताची संख्या वाढली आहे.