मतिमंद मुलांना शिक्षण आणि संगोपन करण्याच्या दृष्टीने स्नेहालय स्पर्श शाळेचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे, अशा संस्थांना समाजाने मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मतिमंद मुलांच्या जीवनात चैतन्य पसरविण्यासाठी अनेकांनी पुढे यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांनी केले आहे.
बेळगाव live शी खास मुलाखत देताना ते बोलत होते.
सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील यांच्या पुढाकारातून ही संस्था सुरु आहे. मतिमंद किंवा दिव्यांग मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन ही शाळा काढली आहे. अशा मुलांना सांभाळणे आणि त्यांना घडविणे हे मोठे काम आहे. या कामाला आर्थिक मदत पुरवून साथ देणे हे प्रत्येक बेळगावकराचे कर्तव्य आहे. असे मोरे यांनी सांगितले.
आपण अनेक संस्थांशी जोडलेलो आहे. त्या संस्था नागरी सहभाग आणि मदतीमुळेच अनेक विधायक कार्ये करू शकतात. स्नेहालय ला ही अनेकांनी मदत केली आहे दरम्यान त्यात आणखी भर पडण्याची आवश्यक्यता आहे, असे मोरे म्हणाले.
आपण नुकतीच या शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे, तेथे बरेचसे काम होऊ शकते, यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले