बेळगाव दि ३ : येत्या 17 फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये निघणाऱ्या सकल मराठा क्रांती (मूक) मोर्चा संदर्भात भांदूर गल्ली येथील स्वराज्य महिला मंडळाने मरगाई मंदिरात बैठकीचे आयोजन केले होते.
कोल्हापूर येथील दोन रणरागिनी कु सई पाटील आणि कु नेहा मुळीक या खास मोर्चा संदर्भात जागृती करण्यासाठी येथे उपस्थित होत्या.त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जायंट्स मेन चे सेक्रेटरी महादेव पाटील, आणि कोल्हापूरचे शाहीर राजाराम पाटील हे उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक स्वराज्य महिला मंडळाच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणु मुतकेकर, यांनी केले.
यावेळी बोलताना रणरागिनी कु नेहा मुळीक म्हणाली की कोपर्डी येथील बालिकेवर झालेल्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे, आम्हाला दुसर्यांचे आरक्षण कमी करून आम्हाला द्या म्हणणारे आम्ही नाही. आमचे आरक्षण आम्हाला मिळावे, अॅट्राॅसिटी कायद्यात दुरुस्ती व्हावी म्हणून महाराष्ट्रात मराठा एकत्र झाला.एक मराठा लाख मराठा ची घोषणा देत एकेका जिल्ह्य़ात चाळीस चाळीस लाख मराठे एकत्र आले. तेंव्हा महिलांनी, तरूणीनी आता पुढे आले पाहिजे,
महिलांनी स्वाभिमानाने जगले पाहिजे . व स्वतः सन्मान घ्यायला शिकले पाहिजे.
छोटी रणरागिनी सई पाटील हीने साक्षात शिवाजी महाराजांचे चरीत्र आपल्या करारी आवाजात सांगितले. शाहीर राजाराम पाटील म्हणाले की शिवाजी राजांनी रांजाच्या पाटलाने एका स्त्री चीन अब्रू लुटली होती , त्या पाटलाचा चौरंग केला होता, व कठोर शिक्षा दिली होती, त्याच पध्दतीने कोपर्डीतील आरोपीना फाशी दिली पाहिजे, किर्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सुधा माणगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
महादेव पाटील यांनी सांगितले की स्वराज्य महिला मंडळाने तातडीने बैठक घेऊन सर्वप्रथम आपल्या मंडळाचा पाठिंबा दिल्याबद्दल व 17 फेब्रुवारीच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत , त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. प्रत्येक महिलांनी बोलायला शिकले पाहीजे, यासाठी एखाद्या भाषणकला कार्यशाळेचे आयोजन करावे असे सांगितले.
जायंट्स मेन च्या वतीने आम्ही मोर्चाच्या सर्वांत शेवटी राहून मिरवणूक मार्गावरील स्वच्छता करणार आहोत असे सांगितले. ज्याना या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर आमच्याशी संपर्क साधावा असे सांगितले. सूत्रसंचलन विजय घाटगे यांनी केले.
यावेळी रेखा मुतकेकर, उपाध्यक्षा सविता होनगेकर, खजिनदार आशा चौगुले, वंदना चौगुले, प्रमिला चौगुले, अनिता पवार, पूनम चौगुले, सरस्वती कामते, कविता जाधव, अंजना चौगुले, अलका जाधव, विजया तळेवाडी, उज्ज्वला चौगुले, लक्ष्मी कुंभार, रंजना मुतकेकर, पार्वती चौगुले, शोभा चौगुले, विद्या चौगुले, यल्लुबाई हेब्बाळकर, अनिता चौगुले, संध्या हळदणकर, सुधा खटावकर, सुलोचना भाकोजी, वैशाली मुतकेकर, पूजा मुतकेकर, स्मिता मुतकेकर, नेहा चौगुले, लक्ष्मी कंग्राळकर, ललिता कंग्राळकर, छाया चौगुले, जयश्री चौगुले, प्रेमा पाटील, गंगू हट्टीकर, शितल हट्टीकर, वैशाली पिसे, रकमा चौगुले, रेणुका चौगुले, सुधा चौगुले, रेखा जुवेकर, गीतांजली चौगुले, व गल्लीतील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
बातमी सौजन्य : महादेव पाटील ( मराठी भाषिक युवा आघाडी )
रोजच्या ताज्या बातम्या , एक वेगळा उपक्रम बेळगाव लाईव्ह च्या माध्यमातून वाचायला मिळतात , आमच्याकडून शुभेच्छा