बेळगाव दि 24: महाशिवरात्री निमित्त बेळगाव येथील कपिलेश्वर मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी होते. भर उन्हात लांबच्या लांब रांगा दर्शनासाठी लागलेल्या असतात, उन्हाचा तडाखा लक्ष्यात घेतयाठिकाणी दिवसभर मोफत पाण्याची सोय करण्यात आली.
सदर सोय हि संघातील युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रावबिण्यात आली. यावेळी संघटनेचे प्रमुख पियुष हावळ ,सागर मुतकेकर , इंद्रजित धामणेकर, अभिषेक तरळे, प्रवीण मंडोळकर, आनंद देसुरकर, आशुतोष कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सदर उपक्रमाचे अनेक स्तरातून कौतुक करण्यात आले.
आम्ही बेळगावकर मराठी संघातर्फे कपिलेश्वर मंदिर येथे मोफत पाणी वाटप कार्यात दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्याचे फलक लावून दुर्गसंवर्धनाच्या कार्याची जागृती करण्यात आली