बेळगाव दि ९ : भविष्य काळात मराठा समाजान एकत्रित होऊन आरक्षण तसेच न्याय हक्कासाठी लढाव आणि बेळगावातील मराठी भाषिकांनी सर्व गट तट विसरून मोर्चात सहभागी व्हाव यात ग्रामीण भागाची संख्या अधिक असायली हवी असे मत युवा नेते एस एम बेळवटकर यांनी व्यक्त केल.
बेळगाव तालुक्यातील बहाद्दरवाडी गावात मूक मोर्चा जनजागृती सभेत बोलत होते . ही सभा गावाच्या देवालयाच्या समोर आयोजित करण्यात आली होती . किणये ,कर्ले,नावगे, जानेवाडी आणि रनकुंडये गावातील मोनाप्पा पाटील नानू पाटील महेश डुकरे आदी मराठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी मोर्चा संयोजक राजेंद्र मुतगेकर,मनोहर किणेकर, भाऊ गडकरी ,दीपक दळवी,प्रकाश मरगाळे, दत्ता उघाडे, महेश जुवेकर आदी उपस्थित होते .
बेळगावच्या इतिहासात मराठी क्रांती मोर्चाने क्रांती घडली पाहिजे मूक मोर्चा एक इतिहास झाला पाहिजे यासाठी गावोगावातील लोकांनी आपापल्या घरांना कुलूप लाऊन लाखोंच्या संख्येन मोर्चात सहभागी व्हायला पाहिजेत आणि शांततेत मोर्चा यशस्वी केला पाहिजेत .