बेळगाव दि २७ :भाषा श्वासा एवढी नैसर्गिक असते कुणालाही मातृ भाषेतून व्यवहार करण्यास अडवणे म्हणजे त्या भागातल्या राज्य सरकारच नाकर्तेपणाच लक्षण आहे. जगात कोणतीही भाषा वाईट नसते प्रत्येक भाषेला स्वताची ओळख असते असे प्रतिपादन कोल्हापूर येथील जेष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांनी मांडले .
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने वि गो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने मराठी विध्यानिकेतन शाळेत आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना मांडले. यावेळी एअर इंडिया चे निवृत्त फ्लाईट इंजिनियर के के हुलजी उपस्थित होते .
सीमा भागात ज्या दोन भाषा एकमेकाशी संघर्ष करताहेत दोन्ही कडे राज्यकर्ते फक्त याचा निरीक्षण करताहेत ही बात योग्य नव्हे हा संघर्ष मिटवून प्रत्येक भाषेला विकसित होण्यासाठी पुरेसा वाव दिला पाहिजे. कोणत्याही भाषेवर किंवा संस्कृती वर अत्याचार केला जातो तेंव्हा ती भाषा संस्कृती विरोधासाठी जास्त ताकतीने उभी राहते. मराठी विद्या निकेतन येतेह आयोजित कार्यक्रमास शेकडो मराठी प्रेमींनी हजेरी लावली होती .